Kolhapur Rankala Talav : समुद्र म्हंटल की कोकण... कोकणातील सुंदर समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात. मात्र, महाराष्ट्रात एक असं स्थळ आहे जिथे समुद्र नाही पण येथे फिरताना येतो चौपाटीवर फिरल्याचा फिल यतो. हे ठिकाण म्हणजे कोल्हापुरचा रंकाळा तलाव(Rankala Lake ) . या रंकाळा तलाव परिसरात समुद्र किनाऱ्यासारखा लुटणाऱ्या कोल्हापुरकरांनी कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे. या गमतीशीर मागणीची चांगलीच चर्चा होतेय. समुद्र होईल तेव्हा होईल पण सध्या तरी कोल्हापुरकांना रंकाळा तलावावरच समाधान मानावे लागणार आहे. जाणून घेवूया याच रंकाळा तलावाविषयी.
रंकाळा तलाव हे कोल्हापुरातील पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरात दुसर्यात क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. रंकाळा तलाव रंकाळा चौपाटी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या 2 किमी अंतरावर आहे. रंकाळा तलाव हा कोल्हापुर शहराच्या मध्यभागी आहे. रंकाळ तलावात राजघाट व मराठा घाट ह्या दोन घाटातुन पाणी येते.
रंकाळा तलावाच्या जागी पूर्वी एक भली मोठी दगडाची खाण होती. या खाणीतूनच महालक्ष्मी मंदिरासाठी दगड आणण्यात आले. राजा गंडरादित्य याने महालक्ष्मी मंदिरासह 360 जैन मंदिरे बांधली त्यासाठी या खाणीतूनच दगड आणण्यात आले होते. देवीच्या वरदानाने हा तलाव निर्माण झाला अशी देखील अख्यायिका आहे. इ.स. 800 ते 900 च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला असे स्थानिक सांगतात. रंकाळा तलावाचे विकासकाम राजा शाहु महाराज यांनी केले. रंकाळा तलाव अडीच मैलांवर पसरलेला असून त्याची मध्यभागी खोली 35फूट आहे. रंकाळा तलावाचे अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तलावाभोवती नारळाची झाडे आहेत जी तलावाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. तलाभोवती चौपाटीसारखी सुंदर तटबंदी करण्यात आली. येथे बसून पर्यटक निसर्गसौंदर्याचा आंनद लुटतात. बोटींग तसेच तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या विविध स्टॉल्समुळे येथे फिरताना पर्यटकांना चौपाटीवर फेरफटका मारल्याचा फिल येतो.
जवळचे रेल्वे स्थानक हे कोल्हापूर आहे. कोल्हापुर मध्यवर्ती बस स्थानकातून रंकाळा तलावापर्यंत जाण्यासाठी एसटीबस देखील आहेत. खाजगी वाहनाने देखील येता जाता येते. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेवून तुम्ही रंकाळा तलावाला भेट देवू शकतो. एक दिवसाच्या पिकनीसाठी हा बेस्ट प्लान आहे.