हा ताडगोळा आहे की.... विचित्र बेडूक पाहून नागरीकांना पडला प्रश्न

बेडूक फुगला तरी त्‍याचा बैल होत नाही अशी म्‍हण आपल्‍याकडे प्रचलित आहे. पण, आज माणगाव इथं असाच पोट फुगवणारा विचित्र जीव नागरीकांना आढळून आला आहे. 

Updated: Nov 7, 2022, 06:34 PM IST
हा ताडगोळा आहे की....  विचित्र बेडूक पाहून नागरीकांना पडला प्रश्न title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : जगभरात लाखो प्रकारचे चित्र विचित्र जीव आढून येतात. यामुळे पाहणारे लोक अचंबित होतात. असाच एक अजब प्रकारचा जीव रायगडमधील(Raigad) माणगाव (Mangaon) मध्ये आढळून आला आहे. याचा आकार ताडगोळयासारखा (palm) गोल गरगरीत आहे. हा लहानसा विचित्र जीव पाहून नागरीकही बुचकळयात पडले आहेत. बलून फ्रॉग (balloon frog) जातीचा हा दुर्मिळ बेडूक (rare frog) आहे. 

पोट फुगवणारा बेडूक

बेडूक फुगला तरी त्‍याचा बैल होत नाही अशी म्‍हण आपल्‍याकडे प्रचलित आहे. पण, आज माणगाव इथं असाच पोट फुगवणारा विचित्र जीव नागरीकांना आढळून आला आहे. 

ताडगोळ्यासारखा दिसते कासवासारखा चालतो

ताडगोळयासारखा गोल गरगरीत दिसणारा हा जीव कासवासारखा हळूहळू मार्गक्रमण करत होता. काहीतरी वेगळं आहे म्‍हणून त्‍याला काठीने डिवचताच त्‍याने आपले डोके आणि चारही पाय आतमध्‍ये घेतले.  अशा प्रकारचा प्राणी पहिल्‍यांदाच दृष्‍टीस पडला. स्थानिकांच्या माहितीनुसार वन्‍यजीव अभ्‍यासक शंतनु कुवेसकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी हा बेडूकच असल्‍याचे सांगितले.

बलून फ्रॉग जातीचा बेडूक

हा बेडूक आपला आकार फुगवू शकतो बेडकांच्‍या ज्‍या वेगवेगळया प्रजाती आढळून येतात. त्‍यापैकी हा बलुन फ्रॉग या प्रजातीमधील बेडूक असल्याचे त्यांनी सांगितले. हा बेडूक कासवासारखे आपले पाय आणि डोके आतमध्‍ये घेवू शकतो. प्राथमिक निरीक्षणानंतर शंतनु कुवेसकर यांनी या बेडकाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सध्या या बेडकाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.