"तर मी तुझ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करेन," शिक्षिकेची विद्यार्थ्याला ऑफर, पोलीसही चक्रावले

Crime News: भिवंडीत (Bhivandi) एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Updated: Mar 24, 2023, 09:00 AM IST
"तर मी तुझ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करेन," शिक्षिकेची विद्यार्थ्याला ऑफर, पोलीसही चक्रावले title=

Crime News: भिवंडीत (Bhivandi) एका शिक्षिकेनेच अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. भिवंडी येथील शासकीय निरीक्षण आणि बालगृहात हा प्रकार घडलं आहे. पीडित मुलं ही तिथे पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलेली होती. पीडित मुलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिक्षिकेने एका मुलाला जर तू माझी मदत केली तर शरीरसंबंध प्रस्थापित करेन असं अमिष दिलं असल्याचीही धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. 

भिवंडीतील कचेरीपाडा येथे शासकीय निरीक्षण गृह आणि बालगृह आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आलं होतं. यामध्येच या आरोपी शिक्षिकेचाही समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्याविरोधात सतत तक्रारी येत होत्या. यानंतर बाल न्यायालयीन विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. यानुसार जिल्हा महिला बालविकास विभागाकडून चौकशी करण्यात आली. यादरम्यान शिक्षिकेचे आपल्यासोबतचे कर्मचारी आणि नियुक्ती करणाऱ्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांबरोबर वाद सुरु असल्याचं समोर आलं होतं. महत्वाचं म्हणजे या शिक्षेकेवर काही महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई कऱण्यात आली होती. 

चौकशीदरम्यान शिक्षिकेने मुलांचा लैंगिक छळ केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुलांच्या तक्रारीनंतर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी अजून चौकशी सुरु आहे.

मुलाला शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर

चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेचे इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद होते. याचा वादातून तिने त्यांच्याविरोधात कट रचला होता. धक्कादायक म्हणजे याचा भाग म्हणून तिने एका अल्पवयीन मुलीला आपल्यासह सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. ‘तू मला मदत केल्यास तुझ्यासमवेत शरीरसंबंध प्रस्थापित करेल’ असं अमिष तिने दिलं होतं. पीडित मुलानेच चौकशीदरम्यान जिल्हा महिला बालविकास विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना ही माहिती दिली.