पुणे : पुणे वडार वाडीमध्ये आग लागली होती. पहाटे २ च्या दरम्यान अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. आगीत २५ ते ३० घरं जळाली. २-३ सिलेंडरचा स्फोट झाला. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत कोणी जखमी नाही. मात्र गोरगरिबांच्या संसाराची राख झालीय.
आग लागली तेव्हा परिसरातील सर्व साखर झोपेत होते. अचानक लागलेल्या आगीने परिसकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पण स्थानिकांनी अग्निशमन दलास वेळीच माहिती दिली. यामुळे आग वेळेत आटोक्यात येण्यास मदत झाली.
सिलेंडर स्फोट होण्यामागचं नेमकं कारण काय ? याचा शोध घेतला जात आहे. आजुबाजूच्या नागरिकांकडे यासंदर्भात चौकशी केली जात आहे.