ओसामा बिन लादेन याचा खात्मा करणारा बेल्जियम प्रजातीचा श्वान तैनात

नाशिकच्या गुन्हा अन्वेषण पथकाला तपासासाठी मिळणार बळ

Updated: Aug 4, 2022, 10:40 AM IST
ओसामा बिन लादेन याचा खात्मा करणारा बेल्जियम प्रजातीचा  श्वान तैनात title=
नाशिक पोलिसांच्या ताफ्यात बेल्जियम प्रजातीचा श्वान तैनात

सोनू भिडे, नाशिक - अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी  अल कायदा संघटनेच्या प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यात महत्वाच्या भूमिकेत असलेला आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांनी गौरव केलेल्या बेल्जियन मेलिनोईस प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांच्या ताफ्यात तैनात करण्यात आले.  बेल्जियन मेलिनोईस हे श्वान स्फोटक शोध, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी एक्स्पर्ट आहे. आता हा श्वान नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना साथ देणार आहे. नाशिक पोलिसांच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर या श्वानाच नाव अल्फा असे ठेवण्यात आले आहे. 

कोण आहे हा बेल्जियन मेलिनोईस श्वान

सध्या जगभरात K-9 ऑपरेशन्समध्ये काम करणारे अनेक बेल्जियन मेलिनोईस प्रजातीचे श्वान आहेत. जे तेवढेच धाडसी, निष्ठावान आणि निस्वार्थी आहेत. जगातील सर्वच सैन्य दलात बेल्जियन मेलिनोईस श्वान तैनात आहे. अमेरिकी सैन्य बेल्जियन मेलिनोईस या श्वानाचा वापर मोठ्या आणि महत्वाच्या ऑपरेशन मध्ये करताना दिसून येते. अमेरिकी सैन्याने दोन महत्वाच्या ऑपरेशन मध्ये बेल्जियन मेलिनोईस या श्वानाचा वापर केला होता. 

ओसामा बिन लादेनचा खात्मा करणारया नेव्ही सील टीमसोबत बेल्जियन मेलिनोईस हा श्वान होता. आयएसआयएस म्होरक्या अबू बकर अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी आर्मीच्या डेल्टा फोर्स एलिट युनिटसह बेल्जियन मालिनॉइस हा श्वान होता. कर्तव्य बजावत असताना बेल्जियन मालिनॉइस हा जखमी झाला होता. त्याच्या शौर्याबद्दल अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचा गौरव केल्याच वृत्त स्ट्राइप्स या वृत्त संस्थेन दिल होत.   

महाराष्ट्रात कुठे तैनात आहेत बेल्जियन मेलिनोईस श्वान

 महाराष्ट्रातील सोलापूर शहरापासून गुन्हा अन्वेषणासाठी अशा श्वानाच्या तैनातीची सुरवात झाली. सोलापूर या शहरात पहिले बेल्जियन मेलिनोईस श्वान देण्यात आले. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, कोल्हापूर, बीड, लातूर आणि नागपूर इ. पोलीस विभागांना कुख्यात गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तसेच अंमली पदार्थ शोधून गुन्हेगारांना पकडण्यासाठी ह्या श्वानांचा उपयोग होत आहे. आता नाशिक मधील  कुख्यात गुन्हेगारांना शोधण्यासाठी हे श्वान महत्वाची भूमिका पार पाडेल यात शंका नाही.

Tags: