मुंबई : आज राज्यात ७७१ नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. आज कोरोनाच्या ३५ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रूग्ण संख्या १४,५४१ वर पोहचली असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १ आणि नांदेडमधील एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे.
नाशिक - 21 - 0
नाशिक मनपा - 31 - 0