काय ही वेळ आली? शिंदे सरकारची मोठी घोषणा, कंडक्टरला खावा लागला महिलांचा मार

Women ST Travel 50 percent Discount  : राज्य सरकारने एसटीचा महिलांना यापुढे 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. परंतु त्याची अमलबंजावणी झाली नसल्याचे पुढे आले आहे. तिकीटावरु महिलांनी वाद घातला आणि त्यांनी कंडक्टरला धु..धू धुतले.  

Updated: Mar 15, 2023, 04:04 PM IST
काय ही वेळ आली? शिंदे सरकारची मोठी घोषणा, कंडक्टरला खावा लागला महिलांचा मार title=
संग्रहित छाया

Women ST Travel 50 percent Discount  : आता धक्कादायक बातमी लातूरमधून. राज्यातील शिंदे - फडवणीस सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली. मात्र, ही घोषणाच असल्याचा प्रत्यय आला आहे. सरकारने एसटीचा महिलांना यापुढे 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. परंतु त्याची अमलबंजावणी झाली नसल्याचे पुढे आले आहे. याचा शासन अध्यादेश निघाला नाही. हे सर्वसामान्यांना माहीत नसल्याने याचा बाका प्रसंग एका एसटी कंडक्टरवर आला. काही महिलांनी अर्धे तिकीटाची मागणी केली. मात्र, असं काहीही झालेले नाही, असे सांगत महिलांनी वाद घातला आणि त्यांनी कंडक्टरला धु..धू धुतले. (50 percent discount for women announced in ST, Women beat up conductor for not giving discount in Latur)

लातूरमध्ये एसटी बसच्या कंडक्टरला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. तिकिटावरील 50 टक्के सवलतीवरुन कंडक्टरचा महिलेशी वाद झाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी कंडक्टर गोविंद मुंडे यांना मारहाण केली. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्यामुळे हा वाद झाला. 

महिला प्रवासी 50 टक्के सवलतीने तिकीट मागत होती. तर कंडक्टर नियम दाखवा, अशी विचारणा करत होता. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी मुंडे यांना मारहाण केली. या मारहाणीत गोविंद मुंडे जखमी झालेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यातही चालकाला मारहाण

 पुण्यात पी एम पी एल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून महिलेने पी एम पी एल बस चालकाला मारहाण केली. महिला माजी भाजप नगरसेवक असल्याचा दावा या बस चालकाने केला आहे. स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत चालक शशांक देशमाने यांना मारहाण केली.पुण्यातील अभिनव चौकात दुपारी घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्वारगेट डेपोतील पी एम पी एल बस चे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र 2 वरती सकाळ पाळीत काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात किरकोळ कारचालक महिला आणि चालक यांच्या मध्ये वाद झाले. त्या वादातून महिलेने इतर तीन साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली. 

ज्या चार चाकी गाडीचा अपघात झाला होता ते व त्यांच्या बरोबरील कारमधील इसम हे भाजप चे चे माजी नगरसेवक आहेत, असा दावा देशमाने यांनी केला आहे.जखमी चालकाला ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाने या बाबत कडक भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका पी एम पी एल चालकांनी एकत्र मांडली आहे.