भरदिवसा 40 माकडं गायब; कुठे गेली? कशी गेली? काहीच कळेना

भर दिवसा बाहेर जिल्ह्यातील काही व्यक्ती या माकडांना पकडून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Updated: Nov 27, 2022, 09:06 PM IST
भरदिवसा 40 माकडं गायब; कुठे गेली? कशी गेली? काहीच कळेना title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्यात(Akola) चर्चा रंगली आहे ती अचानक गायब झालेल्या 40 ते 50 माकडांची(40 monkeys missing). काही अज्ञात व्यक्तीची ही माकडे भरदिवसा गायब केली आहेत. ही माकडं का गायब केली आहेत. याबाबत देखील स्थानिकांना अनेक प्रश्न पडले आहेत.  अकोला जिल्ह्यातील पातुर आणि आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत असणाऱ्या परिसरातून ही माकडं गायब झाली आहेत. 

भर दिवसा बाहेर जिल्ह्यातील काही व्यक्ती या माकडांना पकडून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पातुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकाराबाबत वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आल आहे.
पातूर तालुक्यातील कारला या गावात 40 ते 50 माकडे अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मात्र, गावातील काही व्यक्तींना या माकडांचा त्रास होऊ लागला होता.

सिल्लोड येथील सात ते आठ जणांच्या पथकाने चक्क 40 ते 50 माकडे पकडून नेल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे. गावात माकडांची काही लहान पिल्ले अजून वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्या जन्मदात्यांपासून ते वेगळे झाल्याने ही पिल्ले अस्वस्थ होऊन सर्वत्र त्यांचा शोध घेत फिरतांना दिसत आहेत.

या माकडांना पिंजऱ्यात अन्नधान्यांचे आमिश दाखवून या पकडण्यात आले आहे. मात्र, माकडांना पकडण्यासाठी आलेले हे लोक कोण ? त्यांचा माकडं पकडण्यामागचा उद्देश काय ? या संदर्भात अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही.