आज राज्यातील ३ हजार ७०० ग्रामपंचायतींचा निकाल

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. जवळपास ८१ टक्के मतदानाची नोंद सोमवारी झालेल्या मतदानात झाली. सोमवारी १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. 

Updated: Oct 17, 2017, 09:01 AM IST
आज राज्यातील ३ हजार ७०० ग्रामपंचायतींचा निकाल title=

मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. जवळपास ८१ टक्के मतदानाची नोंद सोमवारी झालेल्या मतदानात झाली. सोमवारी १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. 

यातील साधारण ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज ३ हजार ७०० ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. 

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- ३३
पालघर- ५०
रायगड- १६२
रत्नागिरी- १५४
सिंधुदुर्ग- २९३
पुणे- १६८
सोलापूर- १८१
सातारा- २५६
सांगाली- ४२५
कोल्हापूर- ४३५
उस्मानाबाद- १५८
अमरावती- २५०
नागपूर- २३७
वर्धा- ८६
चंद्रपूर- ५२
भंडारा- ३६१
गोंदिया- ३४१
गडचिरोली- २४