शेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी

यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. तम्ही अर्ज भरला नसेल तर अजूनही 24 तास हातात आहेत. 

Updated: Jul 10, 2023, 08:28 PM IST
शेवटचे 24 तास; म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी  title=

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसाठी अर्जासह अनामत रक्कम भरण्याची शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  म्हाडा लॉटरीमधील (Mhada Lottery 2023) 4082 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज  सादरीकरण आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 24 तासांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. 

अर्ज आणि अनामत रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेमधे सहभाग घेणार्‍या अर्जदारांच्या सोयीकरिता 24 तासांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार मंडळातर्फे अर्ज सादर करण्यासाठी मंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेली लिंक उद्या म्हणजेच 11 जुलै 2023 रोजी  संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच कार्यरत राहील तसेच अर्जदारांना अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा उद्या रात्री 11.590 वाजेपर्यंत करता येणार आहे. 

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार ११  जुलै, २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. तर, रात्री  11.59  वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. तसेच  12 जुलै 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 

कधी होणार लॉटरीची सोडत?

17 जुलै 2023 रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 24  जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे. 

मुंबईत कुठे खरेदी करता येणार घर?

सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील 1947, अ‍ॅन्टॉप हिलमधील 417, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील 424 अशी एकूण 2788 घरांचा समावेश आहे.