चाकण : चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. यात काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सर्वजण चाकण औद्योगिक वसाहत आणि नाणेकर वाडी परिसरातले आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनात चाकणमध्ये रास्ता रोको आणि बंद पुकारला होता. या आंदोलनाचा फायदा घेत काही समाजकंटकांनी जाळपोळ आणि तोडफोडीला सुरुवात केली असा पोलिसांना संशय आहे
पुरावे नष्ट करण्यासाठी समाजकंटकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकले. सरकारी वाहने, पोलीस चोकी, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यात ४ ते ५ हजार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.