कल्याण-डोंबिवलीत २ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, आज २० रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा आणखी रुग्ण वाढले

Updated: May 7, 2020, 05:14 PM IST
कल्याण-डोंबिवलीत २ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, आज २० रुग्ण वाढले title=

कल्याण : कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक नव्याने २० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे एका दोन महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिम भागात ७, कल्याण पूर्व मध्ये ५, डोंबिवली पश्चिम येथे ६, डोंबिवली पूर्व मध्ये १ तर आंबिवली येथे १ रुग्ण वाढला आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना बाधिताची संख्या २५३ वर पोहचली असून आतापर्यंत ७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याआधी कल्याण-डोंबिवली शहरांत राहणाऱ्यांना सीमाबंदी करुन त्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत, कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांजवळ करण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. 8 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र आता या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

सध्या कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांची मुंबईत व्यवस्था करण्यासाठी अवधी लागत असल्याने यावर तोडगा निघेपर्यंत सीमा प्रतिबंधित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.