कणकवलीत २ मुलांचा बुडून मृत्यू

युवक शनिवारी दुपारी खेळण्याच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. 

Updated: Jun 11, 2017, 11:37 PM IST
कणकवलीत २ मुलांचा बुडून मृत्यू title=

कणकवली : दोन शाळकरी मुलं नदीत बुडाल्याची दुःखद घटना घडली आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ इथल्या प्रसंजीत कुंभवडेकर आणि रामचंद्र दीपक माणगावकर हे दोन अल्पवयीन युवक शनिवारी दुपारी खेळण्याच्या निमित्ताने घराबाहेर गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. 

याबाबत कणकवली पोलिसात रात्री उशिरा तक्रार दिली. पोलिसानीं तपास केला असता गडनदी पात्रात काल काही मुले खेळत असल्याची माहिती मिळाली. 

नदी किनारी रामचंद्र याची चप्पल मिळाल्याने ते युवक गड नदीत बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज तपासात लावण्यात आला होता. गडनदी पात्रात बोटीने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र यात एकाचा मृतदेह सापडला आहे.