mumbra crime news : ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत स्फोटकं साडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हाधिका-यांच्या छाप्यानंतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आली आहेत. मुंब्रा येथील उल्हास नदीत एका बार्जमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली स्फोटकं कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
तपासादरम्यान 17 डिटोनेटर्स आणि 16 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिवा भागात सक्शन पंप वापरून अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारानी दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी धाड टातली.
यात 17 डिटोनेटर्स, 16 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून, बॉम्ब शोधक पथकाला तातडीने पाचारण करण्यात आलं. दरम्यान यामध्ये सध्यातरी कुठलाही घातपाताचा प्रकार दिसला नसून, रेती उत्खननासाठीच या कांड्या वापरण्यात येत असल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय.
ठाण्यात खाडी परिसरात अवैधपणे रेती उपसणा-या रेती माफियांचं तहसीलदार युवराज बांगर यांच्या पथकानं अक्षरशः कंबरड मोडलं होते. या पथकाने मुंब्रा खाडी पात्रात उतरून उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धाडी मारुन, सर्व साहित्य आणि बोटीही जप्त केल्या होत्या. यात अंदाचे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामुळे वाळू माफियांना जबर दणका बसला होता.