मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. पोलिस दलातही कोरोनामुळे चिंतेच वातावरण आहे. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १,६६६ पर्यंत पोहोचला असून दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत १६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलीस खूप महत्वाची भूमिका बजावत. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, बंदोबस्त, तपासणी यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विले पार्ले पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल अरुण फडतरे (५५) यांच्या मृत्यूबद्दल कळविण्यास खेद होत आहे. ते 'हाय-रिस्क एज-ग्रुप' मध्ये असल्यामुळे काही दिवसांपासून रजेवर होते.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम असतील.
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 22, 2020
गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे करोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांना कोरोनाची लागण होत असली तरीही यामधून बऱ्या होणाऱ्या
227 #CoronaWarriors of @MumbaiPolice have beaten #coronavirus and are back home already.
And they can’t wait to get back at doing what they love the most - ensure that our city’s safe!#AamhiDutyVarAahot#TakingOnCorona pic.twitter.com/kfWc9iYLzf
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) May 20, 2020
पोलिसांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. ४७८ पोलिसांनी कोरोनाच्या विषाणूशी यशस्वी लढा दिला आहे. यामध्ये ३५ पोलीस अधिकारी आणि ४३८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.