'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात

सांगली जिल्ह्यातील  या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे.  तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Updated: Aug 24, 2022, 11:37 PM IST
'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात title=

मुंबई : अनेकदा काही आजारांमुळे संबंधित व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांवर राहतं घर विकण्याची वेळ ओढावते. शत्रूवरही मेडिकल एमरजन्सी (Medical emergency) येऊ नये. मात्र नियतीपुढे कोणाचं काय चालतंय. अशीच एक तुमची आमची सर्वांच्या 14 वर्षांच्या ताईला मदतीचा हात हवाय. तुमची छोटी मदत तिला नवं जीवन देऊ शकते. (14 year teenager girl need your help for medical expences your litile help her given new life)

सांगली जिल्ह्यातील  या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे.  तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र वैद्यकीय खर्चासाठी एकूण 22 लाख रुपयांची आवश्यकता आहे. या ताईच्या घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. 

तीचे आईवडील मोलमजुरी करुन पोट भरतात. जेमतेम करून त्यांच्याकडे आतापर्यंत 1 लाख रक्कम जमा झाली आहे. मात्र ही रक्कम पुरेशी नाही. या कुटुंबियांना उपचारांसाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तुमची छोटीशी मदत तिला नव्याने जगण्याची उमेद देऊ शकते.  वैदयकीय मदतीसाठी आवश्यक ती माहिती देत आहोत.