हिवाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावं? या चुकीमुळं येऊ शकते भरमसाठ बील

Fridge Setting In Winter: हिवाळ्यात अनेकजण फ्रीज बंद करुन ठेवतात. पण असं केल्याने फ्रीजचे नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावे, जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 21, 2023, 03:06 PM IST
हिवाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावं? या चुकीमुळं येऊ शकते भरमसाठ बील title=
what is The Right Temperature for Your Refrigerator in winter

Fridge Setting In Winter: हिवाळा सुरू झाल्यानंतर फ्रीजचे तापमान अगदीच जास्त असल्याचे जाणवू लागते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू लवकर थंड होतात. अशावेळी फ्रीजची सेटिंग्स बदलावी लागते. कारण हिवाळ्यात बाहेरील तापामानातही थंडावा असतो त्यामुळं उन्हाळ्यात फ्रीजचे जितके तापमान असते तितकेच हिवाळ्यात ठेवू नये. जर तुम्ही फ्रीजची सेटिंग्स बदलली नाही तर फ्रीजचा कंप्रेसर अधिक काम करेल आणि लवकर खराब होऊ शकतो. 

टेम्परेचर सेट करा

हिवाळ्यात तापमान आधीपासूनच कमी असते. अशावेळी फ्रीजचे तापमान वाढवले नाही तर आतील पदार्थ फ्रोजन होऊ शकतात आणि कधीकधी खराबही होऊ शकतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी आम्ही एक टिप्स तुम्हाला देत आहोत. हिवाळ्यात फ्रीजचे तापमान काही डिग्रीपर्यंत वाढवल्यास फ्रीजमधील पदार्थ खराब होणार नाहीत. 

वारंवार डी-फ्रॉस्ट करा

फ्रीज वारंवार डी-फ्रॉस्ट करायला हावे. जर डी-फ्रॉस्ट केले नाही तर आत अतिप्रमाणात बर्फ साचला जातो. ज्यामुळं फ्रीजचे तापमान कमी होते आणि आतील खाद्यपदार्थ लवकर खराब होतात आणि फ्रीजचे कंप्रेसरही क्षमतेपेक्षा जास्त काम करते. या कारणांमुळं फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. इतकंच नव्हे तर बर्फ जमा झाल्याने फ्रीजचा दरवाजा खोलणे व बंद होणे कठिण होऊन बसते. चुकून फ्रीजचा दरवाजा बंद झाला नाही तर विजेचे बीलही वाढते तसंच, आतील खाद्यपदार्थ खराब होऊ शकतात. इतकंच नव्हे तर फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. 

बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश फ्रीजमधलं तापमान नियंत्रित करण्यासाठी 1 ते 5 क्रमांक दिलेले असतात. बऱ्याच वेळा अनेक जण फ्रीजमधलं तापमान कमी क्रमांकावर ठेवतात. यामुळे फ्रीजमधल्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते. फ्रीज मीडियम म्हणजेच 3 ते 4 क्रमांकावर ठेवणं योग्य आहे. उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान यादरम्यानच असावं. तर, हिवाळ्यात  फ्रीज 1 क्रमांकावर ठेवावा. त्यामुळं फ्रीज उत्तम राहतो.

व्हेजिटेबल चेंबर 

तुमच्या फ्रीजमध्ये व्हेजिटेबल चेंबर असेल तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हेजिटेबल चेंबरमध्ये तापमान वेगळे असते. ज्यामुळं भाज्या दीर्घकाळासाठी फ्रेश राहतात. हिवाळ्यात व्हेजिटेबल चेंबरचे तापमान 5 ते 7 डिग्रीपर्यंत ठेवलं पाहिजे. यामुळं भाज्या 10 ते 15 दिवसांपर्यंत ताज्या राहतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)