Kneaded dough in fridge: चपाती हा जेवणातील आता अविभाज्य घटक बनला आहे. टिफिनमध्येही चपाती-भाजीचं दिली जाते. तसंच, हल्ली लहान मुलांना शाळेतही चपाती भाजी द्यावी असे सांगितले जाते. त्यामुळं घराघरांत दररोज चपात्या बनवल्या जातात. मात्र, हल्ली अनेक महिला या ऑफिसला जाणाऱ्या असतात. अशावेळी पोळ्यांचे पीठ आधीच मळून ठेवले जाते. कारण पीठ मळा मग पोळ्या लाटा यासगळ्यात सकाळचा खूप वेळ खर्ची जातो. त्यामुळं काही जणी रात्रीच कणिक भिजवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. जेव्हा चपात्या करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा पीठ फ्रीजमधून काढून पोळ्या लाटल्या जातात. पण तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठामुळं अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते. त्यामुळं तुम्ही तुमच्यासह संपूर्ण परिवाराला संकटात टाकत आहात.
जर तुम्ही फ्रीजमध्ये दीर्घकाळापर्यंत पीठ ठेवता. जसं की दहा ते बारा तासांपर्यंत कणिक ठेवत असाल तर त्यात बॅक्टेरिया फैलावण्याची भिती असते. या पीठाच्या पोळ्या खाल्ल्याने फुड पॉइजनिंग होऊ शकते. त्यामुळं पोटदुखी आणि उलट्या होण्याची शक्यता असते.
ताज्या पीठाच्या पोळ्या आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या यात खूप अंतर असते. इतकंच नव्हे तर यामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्यांचे सेवन करत असाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याचबरोबर संक्रमण फैलावणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.
फ्रीजमध्ये दीर्घकाळापर्यंत ठेवलेल्या पीठात मायकोटॉक्सिन आढळतात व ते अधिक फैलावतात. त्यामुळं तुम्हाला अॅसिडिटी आणि पोटाशीसंबंधित तक्रारीचा सामना करावा लागतो. त्यामुळं पोटदुखी व अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
फ्रीजमध्ये जर तुम्ही कणिक भिजवून ठेवून देत असाल तर जास्तीत जास्त 4 ते 5 तासांपर्यंत ठेवा. मात्र, संपूर्ण रात्र व एक-दोन दिवसांपपर्यंत कणिक फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यामळं पोळीचा रंगदेखील बिघडतो. पीठ काळं पडू लागते. तसंच, त्यामुळं आरोग्याच्या तक्रारीदेखील निर्माण होऊ शकतात. तसंच पीठ मळताना त्यात कमी पाणी घाला. कारण जास्त पाण्यामुळं त्यात बॅक्टेरिया फैलावण्याची शक्यता अधिक असते. भिजवलेली कणिक एअर टाइट कंटेनर किंवा झिप लॉक बँगेत ठेवावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)