Kitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

Kitchen Cooking Tips​ : आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. चपातीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेली चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 3, 2024, 05:55 PM IST
Kitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स   title=

Cooking Hacks : फुलका किंवा चपाती ही प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. त्यामुळे भात, डाळ आणि भाज्यांसोबत चपाती हा जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. नुसती फुलका किंवा मऊ, लुसलुशीत चपाती बनवायला सगळ्यांनाच जमत नाही. काही लोक चपाती करायला जातात पण कधी कधी चपाती गोल आणि मऊ होत नाही. अनेकदा चपात्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत. चपातीचा काही भाग खूप पातळ किंवा जाड असल्यामुळे अनेकदा चपाती गोल किंवा फुगीर होत नाही. त्यामुळे चपाती व्यवस्थित होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळणे आवश्यक आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यावर प्रत्येक चपाती फुग्यासारखी फुगते. 

लुसलुशीत पोळी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी

  • गव्हाचे पीठ चाळणीने गाळून घ्या
  • त्यानंतर पीठात चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर पाणी घालून चांगले मळून घ्या.
  • पीठ मळल्यानंतर पिठामध्ये बोटाने खड्डे करायचे.  
  • त्यानंतर 15 ते 20 मिनिटे पीठ झाकून ठेवा.
  • परत हाताला थोडे तेल लावून पीठ परत मळून घ्या
  • त्यानंतर या पीठाचे गोळे तयार करा.
  • एक पीठाचा गोळा घ्या आणि पुरीच्या आकाराएवढी लाटून घ्या. 
  • त्यानंतर त्याच्या एका बाजूला तेल लावा. त्यानंतर पोळी फोल्ड करून पुन्हा तेल लावा. त्यावर पुन्हा कोरड पीठ घाला आणि पोळीला पुन्हा त्रिकोणी आकार द्या.
  • तुम्ही त्रिकोणी आकाराची पोळी त्रिकोणी ठेवू शकता किंवा त्याला गोलाकार आकार देऊ शकता.
  • गरम तव्यावर थोडं तेल टाकून त्यावर चपाती टाकावी.
  • चपातीच्या दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. 
  • यानंतर तुमची मऊ आणि लुसलुशीत चपाती तयार होईल. 

चपाती करताना या चुका टाळा

नॉन-स्टिक तव्यावर पोळी बनवा

कोणत्याही धान्याची पोळी असली तर ती नॉन-स्टिक पॅन करु नये. पोळ नेहमी लोखंडी तव्यावर बनवावी. किंवा मातीचा तवा ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. 

पोळीसाठी धान्याचा वापरा करा

निरोगी राहण्यासाठी पोळी खायची असेल तर नेहमी एकाच धान्यापासून पोळी बनवून खा. अनेक धान्ये मिसळून कधीच पोळी बनवू नका. त्यामुळे पचनात समस्या निर्माण होतात. पोळी ज्वारी, बाजरी, नाचणी, माका किंवा गव्हाच्या पिठापासून बनवू शकता. 

अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळू नाका

गरम पोळी कधीही अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळू नका. असे केल्याने सूक्ष्म कण फॉइलला चिकटतात. आणि ते सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतात.  पोळी ठेवण्यासाठी आणि दुमडण्यासाठी नेहमी कापड्याचा वापर करा. 

मळलेले पीठ थोडा वेळ तसेच ठेवा

जेव्हा तुम्हाला पोळी बनवायची असेल तेव्हा पीठ 5-10 मिनिटे आधीच मळून ठेवा. त्यामुळे पीठ थोडे  मऊ होतो आणि त्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात. यानंतर तयार केलेली पोळी मऊ आणि फुगीर बनते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते.