डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.

Updated: Aug 24, 2024, 09:32 PM IST
डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे title=
(Photo Credit : Social Media)

टाईप 2 डायबेटिजच्या रुग्णांसाठी साखर ही विष समान आहे. साखरेचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते. त्यामुळे अनेक डायबेटिज रुग्ण गोड चवीसाठी बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करतात. मात्र अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात. मात्र स्टेविया डायबेटिजच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे की नाही याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ 'निखिल वत्स' यांनी खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

काय आहे स्टेविया? 

स्टेविया हे एक प्रकारे साखरेचे सब्सटीट्यूट आहे ज्याला स्टेविया झाडाच्या पानांपासून तयार केली जाते. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत हे 100 ते 300 पटीने गोड असते. मात्र यात कार्बोहाइड्रेट, कॅलरीज आणि आर्टिफिशियल इंग्रेडिएंट्स नसतं. परंतु प्रत्येकाला याची चव आवडेलच असे नाही. काही लोकांना याची चव ही मेंथॉल सारखी लागते मात्र चहामध्ये मिसळून तुम्ही हे पिऊ शकता. 

स्टेवियाचे फायदे : 

स्टेविया हे मेडिकलमध्ये मिळणाऱ्या इतर आर्टिफिशिअल स्वीटनर पेक्षा वेगळे असून हे नॅचरल प्रोडक्ट आहे. याचे रोप तुम्ही घरातील कुंडीमध्ये लावू शकता. साऊथ अमेरिका आणि आशियामध्ये स्टेवियाच्या पानांचा चहा तसेच रेसिपीमध्ये उपयोग केला जातो. मार्केटमध्ये स्टेविया पावडर किंवा लिक्विड फॉर्ममध्ये मिळते. मात्र काहीवेळा लोक स्टेवियामध्ये भेसळ करतात त्यापासून ग्राहकांनी सतर्क राहिला हवे. 

हेही वाचा : भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल

 

स्टेवियामुळे होणारे नुकसान : 

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ निखिल वत्सने सांगितले की, डायबेटिजच्या रूग्णांसाठी स्टेव्हिया नक्कीच चांगला पर्याय आहे, परंतु त्याचे तोटे देखील विचारात घेणे आवश्यक आहे. अनेकदा स्टेवियाच्या नावाने भेसळयुक्त गोष्टी विकल्या जातात. भेसळयुक्त स्टेवियामध्ये बेकिंग सोडा आणि कॅलरी समृद्ध गोड कॅफिनसह कृत्रिम स्वीटनरचा समावेश असतो. स्टेवियाचा सर्वात शुद्ध प्रकार स्टेवियोसाइड आहे, जो वापरण्यास सुरक्षित मानला जातो. तेव्हा स्टेविया विकत घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचेल.