अलिबाग : रिपब्लीक चॅनलचे (Republic Channel) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) हे रायगडमध्ये न्यायालयिन कोठडीत आहेत. पण त्यांना तिथून हलवून तळोजा कारागृहात नेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अलिबागचे कारागृह हा ऐतिहासिक किल्ला होता. त्याचा उपयोग नंतर कारागृहासाठी झाला. इथली ही जागा सुरक्षित नसल्याचे आयजी यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. सध्या अर्णब आणि इतर दोन आरोपींचा मुक्काम अलिबागच्या पालिका शाळेत आहे. पण लवकरच त्यांना इथून हलविण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे. अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली.
भाजप आमदार राम कदम रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अर्णब यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जामीन मिळावा हे साकडं ते सिद्धिविनायकाला घालणार आहेत. यासाठी खार इथल्या राहत्या घरापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ते पायी जाणार आहेत.