झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

 Delivery Boy Video : फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र...

Updated: Oct 26, 2022, 09:29 PM IST
झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video title=

Emotional Viral Video:  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Trending Video) होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनाला वेड लावतात. तर काही व्हिडीओ हृदय पिळवटून टाकतात. सर्वांना वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डिलीव्हरी बॉयचे (Delivery boy) अनेक व्हिडीओ सोशल व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ होतोय. झोमॅटो फूड डिलिव्हरी (Zomato Food Delivery) एजंट दिसत आहे. जो ऑनलाइन आलेली फूड ऑर्डर करतात घेऊन जाताना दिसत आहे. चौकातील सिंग्नल लागल्याने तो गाडी थांबवतो. मात्र, दिवसभर केलेल्या कामामुळे तो थकलेला दिसत आहे. थकवा जाणवल्याने त्याने गाडी थांबल्यावर डुकल्या घेतल्या.

आणखी वाचा - Video: रस्त्याच्या मधोमध उभं राहून पोलीस कर्मचाऱ्यानं गायलं गाणं

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जावेद अन्सारी नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कुर्ता आणि पायजमा घातलेला एक डिलिव्हरी एजंट लाल सिग्नलमुळे रस्त्यावर उभा असल्याचं दिसतंय. त्यावेळी त्याने डुलक्या घेतल्या. मात्र, झोपेत गाडी चालवणं जिवावर देखील बेतू शकतं.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, 1 लाख 66 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केलंय. त्याचबरोबर 2.4 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर जोखम अंगावर घेऊन काम करून नये, असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहे.