मुंबई : बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्यापासून अंतर ठेवणं पसंत करतं. त्याच्याशी संबंधीत असलेल्या सगळ्या गोष्टी, फोटोज अगदी चॅट देखील डिलीट केले जातात. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याचा किंवा त्याला विसरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. मात्र अनेकदा असं होतं की, आपल्याला एकेकाळी प्रिय असलेल्या व्यक्तीचा सामना ऑफिसमध्ये करावाच लागला आहे. अशावेळी ती परिस्थिती कशी सांभाळावी हे समजत नही.
कधी कधी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणते जेव्हा तुम्हाला तुमचा एक्ससोबतच ऑफिसमध्ये काम करावे लागते कारण तुमच्या ऑफिसमध्ये अचानक जुन्या जोडीदाराची एन्ट्री होते. असा प्रश्न तुमच्यासमोर आला तर परिस्थिती कशी हाताळायची?
जर इतरांना या नात्याबद्दल माहिती नसेल तर ते गुप्त राहू देणे चांगले आहे. बाकी ऑफिसच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली तर तो विनाकारण गॉसिपचा विषय बनेल. जुने नाते जितके गुप्त राहिल तितके चांगले.
जर तुम्हाला ऑफिसमध्ये एक्सला सामोरे जावे लागत असेल तर या आव्हानापासून पळ काढू नका, तर आरामात सामोरे जा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितके सामान्य वागण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे असा शो करा की आधी काही झाले नाही.
तुम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्यापासून तुम्हाला एकमेकांच्या खाजगी गोष्टी माहीत असतीलच, पण जुन्या गोष्टींवर कधीही चर्चा करू नका, असे केल्याने दोघांच्या जुन्या जखमा हिरव्या होतील. चांगल्या सहकाऱ्यांप्रमाणे नव्याने सुरुवात करणे चांगले.
जर तुम्ही दोघांना एखाद्या प्रकल्पात किंवा संघात स्थान दिले असेल, तर त्याच कार्यालयात इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. ज्यासाठी अधिक संवाद आवश्यक असेल आणि अनावश्यक संवाद टाळा.
जर तुमचा एक्स पाय ओढण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजेच मस्करी करत असेल तर त्यांच्यावर हसणे टाळा. अशा विनोदांकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे कारण राग आल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.