Driving Licence New Rules : RTO ला न जाताच मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

गाडी चालवायला शिका आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा 

Updated: Jun 12, 2021, 12:34 PM IST
Driving Licence New Rules : RTO ला न जाताच मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स  title=

मुंबई : जर तुम्ही Driving Licence करता खूप चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने नवे नियम जाहीर केले आहेत. ड्रायविंग लाइसेंस हवं असेल तर तुम्हाला मान्यता प्राप्त स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करा. (You may soon get a driving licence without any test at RTO) तुमचं या स्कूलमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर एक परीक्षा देऊन ड्रायव्हिंग लाइसन्स मिळेल. 

या नव्या नियमामुळे तुम्हाला RTO च्या फेऱ्या माराव्या लागणार नाही. कोणत्याच एजन्टला मध्यस्ती घेण्याची काहीच गरज नाही. महत्वाचं म्हणजे लायसन्स करता तुम्हाला आता वाट बघावी लागणार नाही. 

जेव्हा तुम्ही गाडी चालवायला शिकत असाल तर ही प्रक्रिया रेकॉर्ड केली जाणार आहे. ही गोष्ट टेक्निकली रेकॉर्ड केली जाणार. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स करता तुम्हाला दुचाकी अथवा कार घेऊन टेस्ट द्यावी लागणार नाही. 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग स्कूल हे मान्यता प्राप्त असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला या गोष्टींची खास काळजी घ्यायची आहे. ड्राइविंग ट्रैक, आईटी आणि बायोमीट्रिक सिस्टम आणि योग्य ट्रेनिंग मिळतंय की नाही याची काळजी घ्यायची आहे. 

तुम्ही ड्रायव्हिंग शिकल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळेल. ते सरळं संबंधित मोटर व्हीकल लायसेन्स अधिकाऱ्याकडे घेऊन जायचं आहे. तुम्हाला तुमचं लायसन्स लगेच मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे 18 वर्षांवरून तरूण पिढीला मदत मिळणार आहे. ड्रायव्हिंग शिकल्यानंतर लगेचच तुम्हाला लायसन्स मिळणार आहे. आता तुम्हाला सारख ऑफिसला जाण्याची काही गरज नाही.