केवळ १० मिनिटांत असं मिळवा इन्स्टंट पॅन कार्ड

जाणून घ्या कसं मिळवाल इन्स्टंट e-PAN ...

Updated: Aug 17, 2020, 02:19 PM IST
केवळ १० मिनिटांत असं मिळवा इन्स्टंट पॅन कार्ड title=

नवी दिल्ली : पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँक अकाऊंट सुरु करण्यापासून ते इनकम टॅक्स भरण्यापर्यंत अनेक कामांमध्ये पॅन कार्ड अनिर्वाय आहे. अजूनही पॅन कार्ड बनवलं नसल्यास आता केवळ 10 मिनिटांत पॅन कार्ड मिळवता येऊ शकतं. 

कसं मिळवाल इन्स्टंट e-PAN -

- https://www.incometaxindiaefiling.gov.in/home  या वेबसाईटवर जावं लागेल.
- त्यानंतर Instant PAN through Aadhaar या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Get New Pan वर क्लिक करा.
- नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर 'I Confirm' वर क्लिक करा.
- रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो साईटवर टाकून व्हेरिफाय करा.
- व्हेरिफिकेशनंतर e-PAN जारी केलं जाईल.
- यात pdf फॉर्मेटमध्ये पॅन कार्डची एक कॉपी मिळते. ज्यावर QR Code असतो. या QR Code मध्ये अर्जदाराचे डेमोग्राफिक डिटेल आणि फोटो असतो. 

दरम्यान, इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये Income Tax Department इन्स्टंट पॅन कार्ड मिळण्यासाठी केवळ 10 मिनिटं लागतात. आतापर्यंत 6.7 लाख लोकांचं इन्स्टंट पॅन कार्ड जनरेट झालं आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत सोनं ६०० पटींनी महागलं; १९४७ मध्ये काय होता सोन्याचा भाव?