नवी दिल्ली : पोट निवडणुकीपूर्वी सरकारमधील मंत्र्याने मतदारांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील शिवराज सरकारमधील मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी कोलारस पोट निवडणुकीपूर्वी मतदारांना धमकी दिली आहे.
मंत्री यशोधरा राजे सिंधिया यांनी म्हटलं की, "जर तुम्ही कमळाला मत दिलं नाही तर तुमच्या घरात चूल पेटणार नाही आणि घरही नसेल."
कोलारस विधानसभा पोट निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोलारस विधानसभा क्षेत्र हा काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या क्षेत्रात येतो. भाजपकडून ज्योतिरादित्य यांची अत्या यशोधरा राजे सिंधिया या जोराने प्रचार करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक सिंधिया विरुद्ध सिंधिया अशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने देवेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून महेंद्र यादव मैदानात आहेत.
कोलारस विधानसभा उपचुनाव में आचार सहिंता की खुलेआम धज्जियां उड़ाती भाजपा की मंत्री यशोधरा राजे सिंधिया@INCIndia @JM_Scindia pic.twitter.com/QJnhGPCDdP
— Arun Yadav (@MPArunYadav) February 17, 2018
चूलीची योजना तुमच्यापर्यंत का पोहोचली नाही? भारतीय जनता पक्षाची कमळाची योजना आहे. तुम्ही पंजाला वोट दिलं तर तुमच्याकडे ही योजना येणार नाही. जर तुम्ही पंजाला मत दिलं तर आम्ही तुम्हाला का देऊ घर? आम्ही पंजाच्या हाताने तुम्हाला चूल का देऊ? देणार नाही.
मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.