नोकरीच्या बहाण्याने मॉलमध्ये बोलावून बेशुद्ध केलं, नंतर त्याच अवस्थेत कारमध्ये ओढून नेलं अन्...

गुरुग्राम (Gurugram) येथील मॉलच्या बेसमेंटमध्ये एका 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने सर्वात प्रथम तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये नेऊन बलात्कार केला. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावलं होतं. यावेळी त्याने पाण्यामधून तिला गुंगीचं औषध दिलं आणि बलात्कार केला. 

Updated: Feb 14, 2023, 10:28 AM IST
नोकरीच्या बहाण्याने मॉलमध्ये बोलावून बेशुद्ध केलं, नंतर त्याच अवस्थेत कारमध्ये ओढून नेलं अन्... title=

Crime News: गुरुग्राम (Gurugram) येथील मॉलच्या बेसमेंटमध्ये एका 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने सर्वात प्रथम तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये नेऊन बलात्कार केला. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावलं होतं. यावेळी त्याने पाण्यामधून तिला गुंगीचं औषध दिलं आणि बलात्कार केला. 

तरुणीने सेक्टर 51 मधील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आपण ऑनलाइन जॉब शोधत होता. यावेळी तुषार शर्माच्या नावाच्या व्यक्तीशी आपली भेट झाली. त्याने आपल्याला नोकरी देतो असं आश्वासन दिलं. 

शनिवारी त्याने मुलाखतीच्या बहाण्याने आपल्याला सहारा मॉलमध्ये बोलावलं. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सर्व कागदपत्रं घेऊन पोहोचले होते. तिथे तुषाऱ शर्माशी आपली भेट झाली. त्याने आपल्याला गाडीत बसवलं आणि मॉलच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. 

यावेळी त्याने पिण्यासाठी पाणी दिलं. पाणी प्यायल्यानंतर आपली शुद्ध हरपली. यानंतर त्याने आपल्याला कारमध्ये ढकललं आणि बलात्कार केला. जर आपण या घटनेची कुठेही वाच्यता केली तर मारुन टाकू अशी धमकीही त्याने दिली. यानंतर आपल्याला मॉलच्या पार्किंगमध्ये सोडून त्याने पळ काढला. 

तक्रार मिळाल्यानंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तसंच आरोपी तुषार शर्माविरोधात भारतीय दंड संहितेच्या 328 (विषसदृश्य गोष्टींमार्फत दुखापत ), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासत असून त्याच्या आधारे आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.