Video: पोलीस इन्स्पेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...

Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 4, 2024, 03:19 PM IST
Video: पोलीस इन्स्पेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर... title=
मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल

Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील रकाबगंज येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनची प्रमुख महिला अधिकारी शैली राणा आणि पोलीस निरिक्षक पवन नागर यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलीस निरिक्षक असलेल्या शैली राणाच्या घरी तुमचा पती गेला अशी माहिती तिच्या सहकाऱ्यानेच पवन नागर यांची पत्नी गीता नागर यांना दिली होती. त्यानंतर आपल्या सहकाऱ्याबरोबर विवाहबाह्यसंबंध ठेवणाऱ्या पोलीस निरिक्षकाला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडलं. गीता नागर या त्यांचा भाऊ ज्वाला नागर, वहिनी सोनिया नागर, मुलगा अधिराज नागर आणि भाचा दिग्विजय नागरसहीत महिला पोलीस निरिक्षक शैली राणाच्या घरी पोहोचल्या. दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर सर्वांनी या दोघांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

कर्मचाऱ्यांनीच व्हायरल केला व्हिडीओ

मारहाण होत असताना या महिला पोलीस स्टेशनमधील कोणताही कर्मचारी मध्ये पडला नाही. उलट शैली राणा यांना मारहाण होत असतानाच व्हिडीओ त्यांच्याच सहकारी महिला कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करुन व्हायरल केला. डीसीपींनी या प्रकरणामध्ये व्हिडीओ शुटींग केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमधीलच 8 कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये डीसीपी सिटी यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे या पोलीस स्टेशनमधील हवालदार ऋषिकेश आणि विशाल यांच्याबरोबरच कॉन्सटेबल रेखा यांना निलंबित केल्याचं वृत्त स्थानिक हिंदी वेबसाईटने दिली आहे.

नक्की वाचा >> Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...

6 जणांविरोधात गुन्हा दाखल; अनेकजण निलंबित

तसेच या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचारी सुनील लाम्बा, देवेंद्र यांच्याबरोबर पोलीस शिपाई तसेच पीव्हीआरवर तैनात शिपाई गिरीश, चालक राजेंद्र यांना नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये पवन नागर यांची पत्नी गीता यांच्याबरोबरच 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला राणा यांच्या कारभाराबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांमध्येच नाराजी होती. म्हणूनच त्यांनी शैला राणा आणि निरिक्षक पवन नागर यांच्या प्रेमसंबंधांची माहिती पवन यांच्या पत्नीला कळवली.

300 किलोमीटर प्रवास

पतीला धडा शिकवण्यासाठी गीता नागर या तब्बल 300 किलोमीटर प्रवास करुन आल्या होत्या. पवन नागर हे त्यांची कथित प्रेयसी असलेल्या शैली राणा यांच्या घरी पोहचल्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर गिता नागर पूर्ण तयारीने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी पती कुठे आहे यासंदर्भातील चौकशी केली असता ते शैली नागरच्या घरी असल्याचं समजल्यानंतर त्या तिथे आपल्या नातेवाईकांसहीत पोहचल्या आणि त्यांनी दोघांना मारहाण केली. खरं तर पवन यांनी पोस्टींग मुजफ्पर नगरमध्ये होती. मात्र व्हिझलन्स ऑफिसर म्हणून ते आग्रा येथे कार्यरत होते.