हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री निवडीवरुन भाजपमध्ये राडा, धुमल समर्थक आक्रमक

हिमाचल प्रदेशाचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शिमल्यात सुरु झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीआधी प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 22, 2017, 03:42 PM IST
हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री निवडीवरुन भाजपमध्ये राडा, धुमल समर्थक आक्रमक title=
Image Credit: ANI

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशाचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शिमल्यात सुरु झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीआधी प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

 मुख्यमंत्रीपदाच्या नावावर एकमत नाही!

आमदारांच्या बैठकीसाठी दिल्लीहून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि नरेंद्र सिंह तोमर शिमल्यात पोहोचले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावावर एकमत व्हावं यासाठी या दोन्ही नेत्यांची संघाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच ही घोषणाबाजी करण्यात आली. 

धुमळ शर्यतीतून बाहेर पडल्याने...

हिमाचलमध्ये संपूर्ण बहुमत मिळालं असलं, तरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आलेले प्रेमकुमार धुमल मात्र पराभूत झालेत. त्यामुळे आता धुमल यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकलं गेलंय.  पण धुमल यांनाच मुख्यमंत्री करावं असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी केलीय. 

यांच्या नावासाठीही जोरदार लॉबिंग

तर तिकडे पाच वेळा निवडणूक जिंकलेले भाजप आमदार जयराम ठाकूर यांच्या नावासाठीही जोरदार लॉबिंग सुरू आहे.  अशा परिस्थीत संघाच्या नेत्याशी बैठक सुरू असतानाच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.