स्विगीच्या बॅगसोबत दिसलेली बुरख्यातील 'ती' महिला काय करते? 'मिस्ट्री वुमन'चे सत्य अखेर समोर

Burqa woman :  या महिलेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेकांनी त्या महिलेच्या मेहनतीचे कौतुक केले. मात्र चेहरा दिसत नसल्यामुळे ती कोण होती हे ओखळण्यात अडचण येत होती. 

Updated: Jan 16, 2023, 07:05 PM IST
स्विगीच्या बॅगसोबत दिसलेली बुरख्यातील 'ती' महिला काय करते? 'मिस्ट्री वुमन'चे सत्य अखेर समोर title=

Burqa woman carrying a Swiggy bag : काही दिवसांपूर्वी एक बुरखा घातलेली महिला स्विगीची डिलिव्हरी बॅग घेऊन जात असलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर ही महिला कोण आहे अशी एकच चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. काही लोकांनी तर फोटो खोटा असल्याचेही म्हटले होते. तर काहींनी या महिलेचे जोरदार कौतुक देखील केले होते. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा फोटो लखनऊमधील असल्याचे समोर आले आहे.

लखनऊमधील नदवा कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीवर स्विगी बॅग (Swiggy bag) घेऊन या बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो कोणीतरी क्लिक केला होता. फोटो क्लिक करणाऱ्या व्यक्तीने तो सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता हा तो तुफान व्हायरल झाला. लोकांनी त्या महिलेच्या मेहनतीचे कौतुक केले. मात्र चेहरा दिसत नसल्यामुळे ती कोण होती हे ओखळण्यात अडचण येत होती. 

कोण आहे ही महिला?

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिली स्विगीची फूड व्हिलीव्हरी करणार नसल्याचे समोर आले आहे. रिजवाना असे तिचे नाव असून ती कमाईसाठी लोकांच्या घरी काम करते. ती डालीगंज परिसरातील अनेक घरांमध्ये काम करते. यातून महिलेला महिन्याला 1500 रुपये मिळतात. संध्याकाळी ती काही दुकाने आणि स्टॉलवर डिस्पोजेबल ग्लासेस आणि कपडे विकते. यातून तिला प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर 1 ते 2 रुपये मिळतात. रिझवाना यातून महिन्याला 5,000 ते 6,000 रुपये कमावते.

23 वर्षांपूर्वी रिझवानाचे लग्न झाले होते, मात्र तिचा पती तिला काहीही न बोलता घरातून निघून गेला. तिचा पती रिक्षा चालवायचा पण रिक्षा चोरीला गेल्यानंतर तो भीक मागू लागला. यानंतर मुलांची जबाबदारी रिझवानावर आली. रिझवानाला चार मुले आहेत.  मोठ्या मुलीचे वय लुबना असून तिचे वय 22 वर्षे असून ती विवाहित आहे. बुशरा 19 वर्षांची आहे. नशरा 7 वर्षांची आहे. मुलाचे नाव मोहम्मद याशी आहे. रिझवाना एकटीच तिच्या कुटुंबाचा खर्च चालवते. 

स्विगीच्या बॅगसोबत काय करत होती रिझवाना?

स्विगीच्या बॅगसोबत व्हायरल झालेल्या फोटोबाबत विचारले असता रिझवानाने त्याबाबत माहिती दिली आहे. "मला डिस्पोजेबल ग्लास आणि कप ठेवण्यासाठी एक मजबूत बॅग हवी होती. म्हणून, मी ती बॅग डालीगंज पुलावर एका व्यक्तीकडून 50 रुपयांना विकत घेतली. तेव्हापासून मी माझे सामान या बॅगेत ठेवते. मी स्विगीसाठी काम करत नाही. मी माझ्या सर्व वस्तू या पिशवीत घेऊन कामासाठी बाजारात जाते," असे रिझवानाने सांगितले.