मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरलाय. नागरिकांना कोरोनाचा धोका होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणात देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. पण बहुतेक नागरिकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर विविध दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. काहींना लस घेतल्यानंतर ताप आला. काहींना अशक्तपणा, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. या दुष्परिणामांचा अर्थ म्हणजे शरीराकडून लसीचा सकारात्मकपणे स्वीकार केला जात आहे.
ज्यांना लस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवत नाहीत, त्यांची रोगप्रतिकार शक्ती लसीचा योग्य प्रकारे स्वीकार करत नाहीये, असा त्याचा अर्था होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. अहवालानुसार, लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसायला हवेच, असं काही गरजेचं नाही. काहींना लस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणवत नाही. पण त्यांची रोग प्रतिकारशक्ती ही दुष्परिणाम झालेल्यांसारखीच असते.
तज्ज्ञांनुसार, लस घेतल्यानंतर एखाद्याला ताप आला नाही, तर त्याचा अर्थ असा की त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती बळकट आहे. लस त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीला कोणत्याही प्रकारे बाधित करु शकत नाही. परिणामी रोगप्रतिकार शक्तीमुळे संबंधित व्यक्तींमध्ये लस घेतल्यावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसत नाहीत.
फायजर आणि मॉर्डनाचं म्हणणं काय?
फायजरने कोरोना लसीची चाचणी सुरु केली. तेव्हा 50 टक्के लोकांना कोणत्याही प्रकारे दुष्परिणान न जाणवल्याचं निदान झालं. "तसेच 10 पैकी एकालाच या लसीचे दुष्परिणाम जाणवतात. पण 95 टक्के लोकांमध्ये लसीमुळे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती तयार होते. यावरुन हे सिद्ध होतं की लसीकरणानंतर दुष्परिणाम दिसो अथवा नाही, पण लस प्रभावशाली असल्याचं सिद्ध होतं", असं मॉर्डनाकडून स्पष्ट करण्यात आलं.
सर्वांनाच दुष्परिणामांचा सामना करावा लागत नाही
लस घेतल्यानंतर काहींना साधारण त्रास होतो. तर काहींना गंभीर त्रास होतो. उदाहरण म्हणजे बेशुद्धपणा किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणं. पण यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. हा पण दुष्परिणामाचा भाग आहे. लस घेतल्यानंतर येणाऱ्या बेशुद्धपणाला विज्ञानाच्या भाषेत syncope म्हटलं जातं.
असं नक्की का होतं?
लस घेतल्यानंतर चक्कर येणं, तसेच डोळ्यासमोर अंधारी येते. असं नेमकं का होतं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर त्याचं कारण असं आहे की, लस घेतल्यानंतर अनेकांना वेदना सहन होत नाहीत. लस घेताना काही गडबड होणार नाही ना, अशीही चिंता काहींना वाटत असते. यामुळे सुद्धा काही जणं बेशुद्ध होताात. याला immunization anxiety असं म्हटलं जातं. यानुसार काहींच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे बेशुद्धपणा येतो.
गंभीर दुष्परिणाम
सामान्य दुष्परिणामांबद्दल बोलायचं झालं तर, लस घेतल्यानंतर काही तासानंतर हे दुष्परिणाम सुरु होतात. हे परिणाम लस घेतल्यानंतरच्या 3-4 दिवसांमध्ये होऊ शकतात. त्यानंतर त्याचा काही परिणाम जाणवत नाही. लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत अशक्तपणा किंवा रक्तदाब अचानक कमी होणे दिसून येते.
म्हणूनच लस केंद्रातील लोकांना लसीकरणानंतर थांबायला सांगितले जाते. असा अनुचित प्रकार घडल्यास अशा लोकांना त्वरित रुग्णालयात नेले जाऊ शकते. पण अशी घटना क्वचितच पाहायला मिळते.
संबंधित बातम्या :
कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदाराला ईडीकडून अटक
Maratha Reservation : आरक्षणासाठी उद्यापासून मूक आंदोलन, संभाजीराजेंनी केलं 'हे' आवाहन