Weather Update | शाहीन चक्रीवादळाचा भयानक धोका; या 7 राज्यांना अलर्ट

गुजरात आणि बिहारसह 7 राज्यांमध्ये पुढील 3 दिवसांपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे

Updated: Oct 1, 2021, 03:26 PM IST
Weather Update | शाहीन चक्रीवादळाचा भयानक धोका; या 7 राज्यांना अलर्ट title=

नवी दिल्ली : गुजरात आणि बिहारसह 7 राज्यांमध्ये पुढील 3 दिवसांपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विज्ञान विभागाने अलर्ट जारी केला आहे. शाहीन चक्रीवादळ पुढे सरकत मजबूत होत आहे. या आधी 26 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टी परिसरात गुलाब चक्रीवादळाने हाहाकार उडाला होता. त्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला होता.

या 7 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कमी दाबाचा पट्टा आता शाहीन चक्रीवादळात रुपांतरीत झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये दिसू शकतो. या राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ खतरनाक रुप घेण्याची शक्यता
शाहीन चक्रीवादळ आज रात्री उशीरापर्यंत किंवा उद्या सकाळी खतरनाक रुप घेऊ शकते. यामुळे कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये तीव्र पाऊस होऊ शकतो. अरबी समुद्रात प्रवेश केल्यानंतर पुढील काही तासात शाहीन चक्रीवादळ पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता आहे.