नवी दिल्ली: वॅक्सिंग करणे हे इस्लामविरोधी असल्याचा अजब फतवा दारुल उलूम देवबंदने काढला आहे. यापूर्वीही दारुल उलूमकडून अनेक वादग्रस्त फतवे काढण्यात आले होते.
अब्दुल अजीज या व्यक्तीने महिला आणि पुरुषांनी वॅक्सिंग करणे शरियानुसार योग्य आहे का, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना दारुल उलूमने म्हटले की, नाभीच्या खालचा भाग, काख आणि मिशी वगळता शरीराच्या अन्य भागावरील केस काढणे योग्य नसल्याचे दारुल उलूमने फतव्यात म्हटले आहे.