लखनऊ : लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस हायवेवरच्या उन्नाव शहराजवळ आज वायूसेनेच्या विमानांनी डोळ्याचं पारणं फेड़णाऱ्या कवायती सादर केल्या.
उन्नावजवळ सकाळी 10 वाजता भारतीय वायूसेनेच्या सगळ्याच विमानांनी टच डाऊन लँडिंगचा सराव केला. त्यात प्रामुख्यानं मिराज, जग्वार, सुखोई आणि हर्कुलिस विमानांनी कवायती केल्या.
हर्कुलिस विमानातून यावेळी गरुड कमांडो खाली उतरले. एकूण 20 लढाऊ आणि मालवाहू विमानांनी या सरावात सहभाग घेतलाय.
आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी एक्सप्रेस-वेचा वापर लढाऊ विमानं आणि मालवाहू विमानांना करता यावा यासाठी वायू दल हा सराव करतंय. काही महिन्यांपूर्वी याच एक्सप्रेस-वेवर मिराज-2000 नं सराव केला होता.