Galwan Clash Video: गलवान संघर्षाचा आणखी एक Video Viral; भारत- चीनची टक्कर सर्वांसमोर

चीन हा व्हिडीओ पोस्ट करुन नेमकं काय सांगू पाहतंय?   

Updated: Aug 3, 2021, 05:58 PM IST
Galwan Clash Video: गलवान संघर्षाचा आणखी एक Video Viral; भारत- चीनची टक्कर सर्वांसमोर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारत आणि चीन (India china) या दोन्ही राष्ट्रांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाचा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. खुदद् चीनकडूनच हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. यापूर्वीही सदर घटनेचे काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. पण, आता नव्यानं शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा भारतीय सैनिक कशा प्रकारे मोठ्या धीरानं चीनी सैन्याला सामोरे गेले होते, याचीच झलक पाहायला मिळत आहे. 

चीनमधील एका वाहिनीवर हा व्हिडीओ (Video) प्रदर्शित केला गेल्याचं कळत असून, त्यादरम्यान पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात  (PLA) मधील शहीद जवानांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला गेल्याचं कळत आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील जवानांचा संघर्ष या व्हिडीओत दिसत असून, चीनच्या सैनिकांशी भारतीय जवानांनी कशी टक्कर दिली हे स्पष्टपणे दिसून येत आहे. काही चीनी सैनिकांना नदीच्या प्रवाहात तगही धरता न आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 

CBSE Class 10th Results : सीबीएसईचा निकाल जाहीर, असा पाहावा निकाल

 

गंभीर परिस्थितीत चीनला दिलं प्रत्युत्तर 
चीनचे जवान भारतीय सैनिकांवर दडगफेक करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हिंसेची काही दृश्यही या व्हिडीओत दिसत आहेत. गलवानचं भौगोलिक स्थान पाहता भारतीय सौनिकांनी अतिशय गंभीर वातावरणातही चीनला सडेतोड उत्तर दिल्याचा प्रत्ययच हा व्हिडीओ देत आहे. 

दरम्यान, गलवान (Galwan) खोऱ्यातील हिंसाचारामध्ये आपल्या देशातील 4 जवान शहीद झाल्याचा कांगावा सुरुवातीला चीननं केला. ज्यानंतर हा आकडा पाचवर नेण्यात आला. पण, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या हिंसाचारामध्ये चीनचे जवळपास 40 ते 45 जवान मारले गेले होते. तिथं भारतीय सैन्यातूनही 20 जवानांना या संघर्षात आपले प्राण गमवावे लागले होते.