भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये शनिवारी मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला. या पावसामुळे भोपाळमधील वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, त्याच दरम्यान काही ठिकाणी घरं, इमारत कोसळल्याचं वृत्त समोर आलं. अशीच एक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भोपाळमधील बागसेवनिया परिसरात राष्ट्रीय संस्कृत संस्थेचा कार्यालयाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर, लखीमपुरा परिसरात ७० वर्ष जुनं घर अचानक कोसळलं. या घरात पती-पत्नीसह परिवारातील इतर चार सदस्य घटनेवेळी उपस्थित होते सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
#WATCH: A two-storey building collapses in Bhopal's Lakherapura Chowk, trapping four people under the rubble. #MadhyaPradesh pic.twitter.com/1JkDn1Kphv
— ANI (@ANI) June 9, 2018
घर अचानक कोसळण्यास सुरुवात झाली त्यावेळी संपूर्ण परिवार दुसऱ्या मजल्यावर होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि बचावपथकाने मिळून अर्ध्या तासाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं. हे घर कोसळल्याने घराखाली पार्क केलेल्या अर्धा डझन बाईक, ३ दुकानं आणि घरमालकाचं सामान ढिगाऱ्याखाली अडकलं.