नवी दिल्ली : राणी पद्मावतीवरील सिनेमा रिलीज केला, तर याद राखा, असा इशारा करणी सेनेने सरकारला दिला आहे.
राणी पद्मावती सिनेमाचं नाव आता पद्मावत असं करण्यात आलं आहे, तरी देखील करणी सिनेने आपली कट्टर भूमिका कायम ठेवली आहे.
चित्रपट प्रदर्शित केला तर आपण देशभरात आंदोलन उभारणार असल्याचं करणी सेनेने म्हटलं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याचं आश्वासन दिलं होतं, पण कुणाच्या तरी दबावाखाली, चित्रपटाला हिरवा कंदील देण्यात आल्याचा आरोप करणी सेनेनं केला होता.
पद्मावत सिनेमाला 30 सप्टेंबररोजी सर्टीफिकेट मिळालं, पद्मावती ऐवजी नाव बदलण्याची सूचना बोर्डाने केली होती, त्यानुसार पद्मवात नाव देण्यात आलं आहे.