लग्नात असं गिफ्ट दिलं जे तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल, व्हिडीओ

लग्नातलं हे गिफ्ट पाहून लग्नातील वऱ्हाडीही पळाले....हे गिफ्ट पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही... पाहा व्हिडीओ

Updated: Nov 26, 2021, 09:22 PM IST
लग्नात असं गिफ्ट दिलं जे तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल, व्हिडीओ title=

मुंबई: लग्न मंडपात अनेक गमतीजमती होत असतात. बऱ्याचदा मित्र-मैत्रिणी नवरदेव आणि वधूसोबत मस्करीही करत असतात. अशाच गमतीजमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असतात. एक लग्न सोहळ्यात मोठी गंमत झाली. नवरदेव आणि नववधूही पाहात राहिले. मात्र सत्य कळल्यावर नववधूलाही हसू आवरेना झालं. 

लग्न सोहळ्यातला मित्रांचा हा प्रँक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ala_motha_photographer नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला 4 लाखहून अधिक लोकांनी पाहिल असून खूप लाईक आणि कमेंट्सही केल्या आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मित्र एक बॉक्स घेऊन स्टेजवर येतात. हा बॉक्स पाहून असं वाटतंय की यामध्ये काहीतरी मोठं गिफ्ट असावं. कदाचित फ्रीज किंवा वॉशिंगमशीन किंवा मोठी इलेक्ट्रॉनिकची वस्तू असावी असा अंदाज नववधू आणि नवरदेवानं बांधला. 

या बॉक्सला वरून फुलांनी मजेशीर पद्धतीनं सजवण्यात आलं. अगदी अवजड सामान उजलावं असं या बॉक्सला लग्नाच्या मंडपात उचलून आणण्यात आलं. ते नववधू आणि नवरदेवाच्या हातात दिलं. 

या दोघांनाही बॉक्स हलका लागला. त्यानंतर तो बॉक्स खाली ठेवताना लक्षात आलं की यामध्ये काहीच नाही. हा बॉक्स रिकामा आहे. त्याला मजेशीर पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार पाहून नववधूलाही हसू आवरेना झालं. हा प्रँक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही.