'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच...' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा!

Wedding Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भटजी लग्नाचे मंत्र म्हणण्याऐवजी चक्क सिनेमातील गाणी गात असल्याचे दिसत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 27, 2024, 04:34 PM IST
'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच...' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा! title=
Viral Video Pandit Ji Sang Shah Rukh Khan And Kajol Hit Romantic Song In Wedding

Wedding Viral Video: सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्न सीझन सुरू असल्यामुळं सोशल मीडियावरही लग्नासंबंधीत अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यामुळं सोशल मीडियावर त्यांच्या फोटो व व्हिडिओचीच चर्चा आहे. अशातच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. लग्न मंडपातील हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत नवरा-नवरी लग्नमंडपात बसले आहेत. तर, भटजी मंत्रांऐवजी बॉलिवूडचे रॉमेंटिक गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लग्नाला आलेले पाहुणेही या पंडितजींचे चाहते झाले आहेत. 

भटजींमुळं आठवणीत राहिलं लग्न

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भटजीबुवा लग्न मांडवातच रोमँटिक गाणी गाता आहेत. तर, मांडवाच्या आजूबाजूला बसलेले लोक गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. याच कारणामुळं हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे आणि लोकांनाही भटजींचा हा अंदाज खूप आवडला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर हा व्हिडिओ  @ChapraZila नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, असे भटजी असतील तर लग्नाची रात्र आरामात निघून जाईल 

2.34 मिनिटांच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 3 लाख 36 हजार जणांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर, आत्तापर्यंत 4 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. लग्न मांडवातच पंडित प्यार होता है दीवाना सनम…. और अखियां मिलाऊं कभी चुराऊं, अशी बॉलिवूड गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन करत आहे. तर, त्याव्यतिरिक्त मध्येच शेरो-शायरी ऐकवून लोकांना लग्न मंडवातच खिळवून ठेवत आहे. मध्य प्रदेशातील छप्रा जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. 

अनेक जण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, मी आत्तापासूनच या भटजींची वेळ बुक केली आहे. एकाने म्हटलं आहे की, भटजींना कदाचित गायक व्हायचे होते. मात्र कुटुंबाने दबाव टाकल्यामुळं ते भटजी झाले. तर, एकाने कमेंट केली आहे की, पंडितने मस्त मनोरंजन केले. तर, काही जणांना लग्नमांडवात भटजीने गाणं म्हणण फारसं आवडलेले दिसत नाहीये. काहींनी म्हटलं आहे की, आता भटजीदेखील धार्मिक कार्यक्रमांची मस्करी करत आहेत. तर, एकाने म्हटलं आहे की, पंडितजींनी शास्त्र आणि मंत्रांची थट्टा केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील भटजी कोण आहेत. हे मात्र अद्याप कळलेले नाहीयेय