हा जुगाड पाहून मोठमोठ्या Engineers ला देखील फुटेल घाम.... पण यांना नाही फुटणार

सध्या भारतात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे सर्वत्र लोकांना खुप उकडत आहे.

Updated: Jul 5, 2021, 08:49 PM IST
हा जुगाड पाहून मोठमोठ्या Engineers ला देखील फुटेल घाम.... पण यांना नाही फुटणार title=

मुंबई : कोणत्याही एका गोष्टीला डोकं लाऊन भलताच वापर करणे भारतीयांना चांगलेच जमते. म्हणून तर आपण म्हणतो की, जुगाडामध्ये कोणीही भारतीयांना मागे टाकू शकत नाही. भारतीयांचे डोकं या साऱ्या गोष्टींमध्ये असे धावते की, बसं रे बसं. असेच भारतीयांच्या जुगाडाचे व्हिडीओ भारतातचं काय तर भारताबाहेर देखील खूप पाहिले जातात. सध्या सोशल मीडियावर भारतीयांच्या जुगाडाचा एक व्हिडीओ भलताच व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्ही म्हणाल की, असा विचार तर आम्ही काधीच केला नव्हता.

सध्या भारतात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे सर्वत्र लोकांना खुप उकडत आहे. अशा परिस्थितीत लोकं या उकाड्यापासून वाचण्यासाठी पंखा, कुलर, एसी आणि थंड पाण्याचा आधार घेतात. परंतु असे काही लोकं आहेत जे आपला स्वत:चा जुगाड वापरतात आणि आपले दिवस काढतात. असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर Civil Engineering नावाच्या ट्विटर युजरने हवेला वाटून घेण्यासाठी तरुणांनी केलेल्या एका जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ एखाद्या वसतीगृहातील असावा असे सांगितले जात आहे. वसतीगृहात असताना पैशांच्या कमतरतेमुळे यांना एसी घेणे शक्य नाही. परंतु गरमी इतकी होत आहे की, यांना त्यासाठी काहीतरी करावेच लागणार होते.  त्यामुळे या दोन्ही तरुणांनी आपल्याला हवा मिळावी यासाठी एक चांगला जुगाड शोधून काढला आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पंखाची हवा सारखी वाटून घेण्यासाठी या दोन तरुणांनी पंखाच्या जाळीवर त्यांची पॅन्ट लावली आहे. जेणेकरून हवा या पॅन्टच्या दोन्हीपर्यंत पायातून पार होऊन या दोघांपर्यंत पोहोचू शकेल. हा जुगाड पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि लोकांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.