मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या लग्न सराई असल्यामुळे लग्न आणि इतर विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक वेळा असं होतं की काही कारणामुळे वधू किंवा वराला लग्नमंडपात पोहोचण्यासाठी उशीर होते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाला लग्नमंडपात पोहोचायला उशीर झाला.
लग्नात प्रत्येक मुलीची इच्छा असते की होणाऱ्या पतीसोबत जेवण करावं. पण व्हिडीओमधील नवरीला एवढी भूक लागली होती, की तिने कसालाचं विचार न करता, पतीची वाट न पाहाता पोट पूजा करण्यास सुरूवात केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरी चायनिज खाताना दिसत आहे. या नवरी भरभरून दागीने आणि ब्राउन रंगाचा गाऊन घातला आहे.
वधूने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'माफ करा मी फूडी सून आहे, माझ्या सासरच्या लोकांना मी आवडते.' असं लिहिलं आहे.