मास्कचा वापर असाही....? हा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसावा.. पाहा यांचा जुगाड

हा भारत आहे, येथील लोकं कधी कोणता जुगाड करतील याचा काही नेम नाही.

Updated: Jul 3, 2021, 09:08 PM IST
मास्कचा वापर असाही....? हा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसावा.. पाहा यांचा जुगाड title=

मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे, प्रत्येक व्यक्तीला फेस मास्क घालणे भारतात सक्तीचे केले आहे. त्यामुळे काही लोकं कपड्याचे म्हणजेच रियुजेबल मास्क घालतात, काही लोकं, एन 95 एन 95 मास्क घालतात, तर काही लोकं एकदाच वापरुन फेकण्यासारखे सर्जीकल मास्क घालतात. असे सर्जीकल मास्क किंवा कोणते ही मास्क काही कालांतराने टाकूण द्यावे लागतात आणि ते टाकून देताना त्यांना पॅक करुन डस्टबिनमध्ये टाकले पाहिजे. जेणे करुन ते पुन्हा वापरात येणार नाही.

पण हा भारत आहे, येथील लोकं कधी कोणता जुगाड करतील याचा काही नेम नाही. त्यात ही गोष्ट देखील खरी आहे भारतातील लोकं कोणत्याही गोष्टीचा पुरेपुर वापर करतात आणि कोणतीही गोष्ट वाया जाऊ देत नाहित. आज आम्हि तुम्हा जे फोटो आणि व्हिडीओ दाखवणार आहोत यावरुन तुम्हाला या गोष्टीची खात्री पटेल.

लोकं मास्क वापराल्यानंतर त्याला फेकण्या एवजी किंवा त्याला वापरण्याऐवजी, ते इतर कारणांसाठी देखील वापरु लागले आहेत. आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी सोशल मीडिया साईट ट्विटरवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये मास्कचा वापर भारतातील लोकं कसा कोणत्या गोष्टींसाठी करत आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि लोकांचा हा जुगाड पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाहीत.

कोणी डायपर केलं, तर कुणी भांडं बनवले

या मास्क रीयूज व्हिडीओमध्ये या मास्कचा कोणी भांडं म्हणून वापर केला, कोणी डायपर म्हणूल आपल्या बाळाला लावला, तर काहींनी त्याला अंबाडा म्हणून वापले आहे. एवढेच काय तर कोहींनी पक्ष्यांसाठी पाळणा बनवला आहे.

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी या व्हिडीओला शेअर करत कॅप्शन लिहिले की, "भारतातील अष्टपैलू.... शेवटपर्यंत सोडत नाहीत.. हे फक्त भारतातच होऊ शकते."

व्हिडीओवर मजेदार कमेंट्स

या मजेदार व्हिडीओवर लोकांनी एकापेक्षा एक कमेंट्स देखील दिल्या आहेत. काही लोकं यातून स्वतःचे जुगाड सुचवत आहेत, तर काही लोकं भारतीयांच्या युक्तींचे कौतुक करत आहेत.