मालिया खेडी (एमपी) : लग्नानंतरची पहिली रात्र ही नवरा बायकोच्या आयुष्यातील खुप सुंदर आणि अविस्मर्णीय रात्र असते आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ती रात्र कधीही संपू नये असे वाटत असते. परंतु मध्यप्रदेशातील विदिशा गावात नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात काही भलतंचं लिहलं होतं. जे ऐकुन पूर्ण विदिशा गावात हाहाकार माजला आहे.
विदिशा गावात लग्नाच्या पहिल्याच रात्री कोणीतरी नवऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केली आहे आणि त्यावेळेस बायकोला बेशुद्ध केलं होतं. या घटनेनंतर या नवीन दामपत्यांचा संसार सुरु होण्यापूर्वीच संपला.
पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. या नवविवाहित जोडप्यांचे नुकतेच जूनमध्ये लग्न झाले होते. त्यानंतर 5 जुलै रोजी त्याची पत्नी घरी आली होती आणि 6 जुलै रोजी रात्री ही घटना घडली. त्यानंतर आता पोलिस प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत.
मालिया खेडी या गावात लग्नाचा आनंद आणि लग्नाच्या सनईचा आवाज अजून घुमत होता तोच या गावात अचानक शोक पसरला.
सून घरी येण्याच्या एक दिवस अगोदर सासूसह घरातील सर्व सदस्य नर्मदेमध्ये स्नान करण्यासाठी होशंगाबादला गेले होते. फक्त नवविवाहित जोडपं घरातच राहिले होते. खरे तर या दोघांना एकत्रात वेळ घालवता यावा यासाठी घरातील मंडळी घराबाहेर पडली होती.
बायको घरी आल्यानंतर पहिल्याच रात्री ही सगळी घटना घडली. सकाळी जेव्हा पत्नीला जाग आली तेव्हा तिने आपल्या पतीचा मृतदेह तिच्या बाजूला पाहिला आणि ती थक्कं झाली. लगेच तिने आपल्या नातेवाईकांना फोन करुन बोलावून घेतलं.
20 जून रोजी या दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर बायको सासरी येऊन काही रिती रिवाज करण्यासाठी पुन्हा माहेरी गेली. त्यानंतर ती पुन्हा घरी आली आली असता त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री ही भयानक घटना घडली.
त्या बायकोला बेशुद्ध केलं होतं, त्यानंतर तिला जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा तिने पाहिले की, कुणीतरी तिच्या पतीचा चेहरा आणि जबडा कापून निर्घृण पणे त्याची हत्या केली आहे. गाल आणि जबड्यावर धार धार शस्त्राने वार केले होते. हत्येनंतर चेहरा इतका भीषण झाला होता की, तो पाहून कोणीही घाबरुन जाईल.
मृताच्या भावाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते आणि एक दिवस आधी त्यांची सून म्हणजेच नववधू घरी आली होती आणि त्याच रात्री ही घटना घडली होती. त्याच्या भावाचा किंवा परिवाराचे कोणसोबत ही कोणते ही वैर नव्हते त्यामुळे हे सगळं कोणी केलं असेल हे त्यांना कळायला काही मार्ग नाही.
या सगळ्या प्रकरणा नंतर आता पोलिस सगळ्या गोष्टीची कसुन चौकशी केली जात आहे.