विक्रम ​मिसरी बनणार नवे डेप्युटी NSA, अजीत डोवाल यांचे नवे सहकारी

विक्रम मिसरी यांची देशाच्या डेप्ट्युटी एनएसए म्हणजेच उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केलीये.

Updated: Dec 28, 2021, 09:55 PM IST
विक्रम ​मिसरी बनणार नवे डेप्युटी NSA, अजीत डोवाल यांचे नवे सहकारी title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीनमधील भारताचे राजदूत राहिलेले अधिकारी विक्रम मिसरी (Vikram Misri) यांची देशाच्या डेप्ट्युटी एनएसए म्हणजेच उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केलीये. ते डेप्युटी एनएसए पंकज शरण (Pankaj Sharan) यांची जागा घेणार आहेत. एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांचे सहकारी म्हणून ते काम करणार आहेत. पंकज शरण यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. ते रशियात देखील भारताचे राजदूत राहिले आहेत.

नवे डेप्युटी एनएसए (New Deputy NSA) विक्रम मिसरी यांना चीन संदर्भातील विषयात एक्सपर्ट मानले जाते.

काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 7 नोव्हेंबर 1964 रोजी विक्रम मिसरी यांचा जन्म झाला. 1989 बॅचचे ते आयएफएस अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेत असताना त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंडर सेक्रेटरी पासून डायरेक्टर पर्यंत पदांवर काम केले आहे. देशाच्या तीन पंतप्रधानांचे ते सचिव देखील राहिले आहेत. त्यांनी 1997 ते मार्च 1998 पर्यंत इंद्र कुमार गुजराल, अक्टोबर 2012 ते मे 2014 पर्यंत मनमोहन सिंग आणि मे 2014 ते जुलै 2014 पर्यंत पीएम नरेंद्र मोदी यांची सचिव म्हणून काम केले आहे.

विक्रम मिसरी यांना चीनबाबत मोठी माहिती आहे. जानेवारी 1991 ते सप्टेंबर 1993 पर्यंत ते बेल्झियममध्ये, ऑगस्ट 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंत म्यानमारमध्ये त्यांनी काम केले आहे. डिसेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारने त्यांना चीनमध्ये भारतीय राजदूत म्हणून पाठवण्यात आले होते.

विक्रम मिसरी यांची 2017 मध्ये झालेल्या डोकलाम वादात भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. यासाठी त्यांनी 3 वर्ष काम केलं. मागच्या वर्षी एप्रील मध्ये जेव्हा लडाखच्या पँगोंग आणि डेपसांग प्लेन्सवर चीनची नियत बिघडली आणि सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य आणलं गेलं. तेव्हा दोन्ही देशाच्या सैन्य प्रमुखांमध्ये चर्चा घडवून आणण्यात मिसरी यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत मिसरी देखील उपस्थित होते.

चीनमध्ये भारतीय राजदूत म्हणून मिसरी यांचा 3 वर्षाचा कार्यकाय या महिन्यात पूर्ण होत आहे. चीनमध्ये नवे राजदूत म्हणून प्रदीप कुमार रावत भारतीय परराष्ट्र सेवेत असून ते 1990 बॅचचे अधिकारी आहेत. मिसरी 1 जानेवारी पासून नवे डेप्ट्युटी एनएसए होणार आहेत. त्यांच्या शिवाय सध्या डेप्ट्युटी एनएसए म्हणून राजेंद्र खन्ना आणि दत्ता पंडसालगिकर काम करत आहेत.