वादग्रस्त 'बिकनी एअरलाइन्स' भारतात होणार लॉन्च, जुलैपासून होणार सुरू

  व्हिएतनामची VietJet एअरलाइन्सने आपल्या नावापेक्षा सर्वाधिक 'बिकिनी एअरलाइन्स' नावाने ओळखली जाते. ही एअरलाइन्स लवकरच आपली सेवा भारतात सुरू करणार आहे.  एअरलाइन्सने जाहीर केले की त्यांची फ्लाइट नवी दिल्ली ते व्हिएतनामच्या ची मीन्ह शहरापर्यंत असणार आहे. ही स्वा जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आमची सहयोगी वेबसाइट DNAमध्ये आलेल्या वृत्तानुसार या एअरलाइन्सची फ्लाइट्स नवी दिल्लीहून आठवड्यातून ४ दिवस उड्डाण करणार आहे. ही एअरलाइन्स सेक्सीएस्ट मार्केटींगसाठी ओळखली जाते. ही एअरलाइन्स एक महिला उद्योजक चालवते. त्यांचे नाव आहे न्यूएन थाई पॉंग थाओ आहे. 

Updated: Mar 19, 2018, 04:14 PM IST
 वादग्रस्त 'बिकनी एअरलाइन्स' भारतात होणार लॉन्च, जुलैपासून होणार सुरू  title=

नवी दिल्ली :  व्हिएतनामची VietJet एअरलाइन्सने आपल्या नावापेक्षा सर्वाधिक 'बिकिनी एअरलाइन्स' नावाने ओळखली जाते. ही एअरलाइन्स लवकरच आपली सेवा भारतात सुरू करणार आहे.  एअरलाइन्सने जाहीर केले की त्यांची फ्लाइट नवी दिल्ली ते व्हिएतनामच्या ची मीन्ह शहरापर्यंत असणार आहे. ही स्वा जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. आमची सहयोगी वेबसाइट DNAमध्ये आलेल्या वृत्तानुसार या एअरलाइन्सची फ्लाइट्स नवी दिल्लीहून आठवड्यातून ४ दिवस उड्डाण करणार आहे. ही एअरलाइन्स सेक्सीएस्ट मार्केटींगसाठी ओळखली जाते. ही एअरलाइन्स एक महिला उद्योजक चालवते. त्यांचे नाव आहे न्यूएन थाई पॉंग थाओ आहे. 

असा निवडला एअरलाइन्सचा ड्रेसकोड

एअरलाइनच्या एअरहोस्टेसचा ड्रेस कोड CEO  न्यूएन थाई पॉंग थाओ  यांनी निवडला आहे. व्हिएतनामच्या त्या पहिल्या बिलीनिअर महिला आहेत. ही एअरलाइन्स फुटबॉल टीमच्या स्वागतासाठी एअरहोस्टेसला लिंगरी परिधान करायला लावली होती. 

वादग्रस्त एअरलाइन्सपैकी एक 

एअरलाइन्सच्या जगात सर्वात वादग्रस्त एअरलाइन्स पैकी ही एक आहे. काही देशात एअर होस्टेसने बिकिनी परिधान करण्यावर बंधने आहेत. तज्ज्ञांच्यामते ही एअरलाइन्स भारतात सुरू झाल्यावर मोठा वाद होऊ शकतो. 

VietJet व्हिएतनामची पहिली प्रायव्हेट एअरलाइन 

VietJet ही व्हिएतनामची ऑपरेट करणारी पहिली खासगी विमानसेवा कंपनी आहे. २०१७ मध्ये १.७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. या एअरलाइनला एकूण ९८६ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ६४ अब्ज रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न झाले आहे. जे २०१६ च्या तुलनेत ४१.८ टक्के अधिक आहे.