Train News : मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनचा (Mumbai Local Train) वापर केला जातो. त्यामुळे मुंबईकरांना अनेकांना हा अनुभव आलाच (Train Viral Video) असेल किंवा सोशल मीडियावर (Video viral on social media) आपण रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. धावती ट्रेन पकडणं जीवावर बेतं हे अनेक वेळा सांगून तरी लोकं वारंवार या गोष्टी करतात. चालत्या ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना झालेले अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत दिसत असतात.
एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक तरुण धावत्या ट्रेन पडकल्याला जातो आणि...तो ट्रेनच्या दरवाज्यालाच लटकतो. त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवर जीआरपी जवानने तिचा जीव वाचविला. त्या तरुणाला वाचविताना ते दोघेही प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) पडले थोडक्यात या दोघांचा जीव वाचला आहे. प्रवासी घाईगडबडीत ट्रेन पकडायला जातात आणि स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. (Video young man fell down running train Viral on social media nmp)
चलती ट्रेन में फंस गया यात्री.. दरअसल जहानाबाद स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर तीन पर गया से पटना जा रही ट्रेन में एक यात्री चढ़ ही रह था कि ट्रेन खुल गयी.लटका यात्री गिरने ही वाला था कि जीआरपी के एएसआई पंकज कुमार की नजर पड़ गई. देखिए कैसे बचाई जान...जहानाबाद से रंजीत राजन की रिपोर्ट. pic.twitter.com/Otm0YdWgP9
— Prakash Kumar (@kumarprakash4u) November 2, 2022
ही घटना जेहानाबाद रेल्वे स्टेशनवरील आहे. व्हिडीओमधील प्रवासी गयाहून पाटण्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये तो चढत असताना ही घटना घडली. तर जीआरपीचे एएसआय पंकज कुमार यांनी त्याचा जीव वाचवला. या घटनेमध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.