झिंग आणणारी चहा.... चहावाल्यानं बनवली Old Monk Tea, पाहा Video

सध्या ओल्ड मॉंकपासून बनवलेल्या चहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र्चंड व्हायरल झाला आहे

Updated: Nov 5, 2022, 03:13 PM IST
झिंग आणणारी चहा.... चहावाल्यानं बनवली Old Monk Tea, पाहा Video title=

मुंबई : असे बरेच लोक आहे ज्यांचा दिवस हा चहाशिवाय सुरु होत नाही. अनेकांना तर Bed वरच चहा हवी असते. आता चहा आणि रमच्या शौकिनां लोकांसाठी एक खास बातमी आहे. आत्तापर्यंत, एका वेळी ते एकतर चहाचा आनंद घेऊ शकत होते किंवा मग रमचा. परंतु एका चहावाल्यानं एक वेगळाच चहा बनवला आहे. या चहावाल्यानं चक्क ओल्ड मॉंक रमचा चहा बनवून लोकांना आश्चर्यचकित केले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोव्यात चहावाल दुकान

वास्तविक, हा व्हिडिओ एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चहावाल्याचे दुकान गोव्यात आहे आणि हा व्हिडिओ त्याच्या दुकानाचा आहे. या व्हिडीओत तो चहा बनवताना दिसत आहे. यासाठी तो कुल्हडमध्ये असं काही तरी टाकून गरम करतो की त्यातून धूर निघू लागतो. 

ओल्ड मॉंक रम टाकतो

थोड्या वेळाने त्या कुल्हडमध्ये छोटी आग लागते आणि ती बाहेर पडते. त्यानंतर, तो त्यात ओल्ड मॉंक रम देखील टाकतो. एकदा ओल्ड मॉंक रम टाकली की, आग वेगाने बाहेर येऊ लागते. यानंतर तो एक किटली उचलतो आणि त्यात आधीच तयार केलेला चहा कुल्हडमध्ये ओततो.

हेही वाचा : 'या' मंदिरात 480 वर्षांपासून सुरु आहे अखंड ज्योत, या कामांसाठी होतो वापर

त्यानं कुल्हडमध्ये चहा टाकताच त्यातून निघणारा धूर थांबतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या चहाची रेसिपी विचारली आहे.