संग्रहालयातून सोन्याच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांकडून लंपास

निजामाच्या अनेक वस्तू चोरीला

Updated: Sep 4, 2018, 05:02 PM IST
संग्रहालयातून सोन्याच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांकडून लंपास title=

हैदराबाद : हैदराबादच्या निजाम वस्तू संग्रहालयात चोरी झाली आहे. सोन्याचा रत्नजडित डबा, रत्नजडीत कप आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुमारे २ किलो वजनाचा तीन कप्पे असलेला टिफिन बॉक्स चोरीला गेला आहे. ज्यावर हिरे आणि रत्नं जडवण्यात आली होती. निजामाचा सोन्याचा कप आणि एक चमचा देखील चोरीला गेला आहे.

निजामाच्या हवेलीत हे वस्तू संग्रहालय आहे. निजाम काळातील अनेक मौल्यवान वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी मध्यरात्री ही चोरी झाली. या सगळ्या वस्तूंची ५० कोटींपेक्षा अधिक आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून याद्वारे चोरांचा शोध घेत आहे. पोलिसांची १० पथके चोरांचा शोध घेत आहे.

या वस्तू संग्रहालयात सुमारे ४५० मौल्यवान वस्तू आहेत. या वस्तू निजाम काळातील असल्याची माहिती संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.