Valentine Day चा ट्रेंड बदलतोय... 8 ते 10 हजारात विकली जातेय कॉल डिटेल

अवघ्या 2 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईड डे आला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 11:52 AM IST
Valentine Day चा ट्रेंड बदलतोय... 8 ते 10 हजारात विकली जातेय कॉल डिटेल title=

मुंबई : अवघ्या 2 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईड डे आला आहे. 

सगळी अगदी गुलाबी प्रेमाचा मूड असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्ही कुणाशी, किती वेळ फोनवर गप्पा मारत आहात याची माहिती आता कुणी तरी मिळवत आहे. आणि ही माहिती अगदी सहज उपलब्ध होत आहे. दैनिक भास्करने याबाबतीत मोठा खुलासा केला आहे. 

व्हॅलेंटाईन डे वर सावट

जिथे एका बाजूला व्हॅलेंटाईन विक म्हणून हा आठवडा साजार होत असताना अशा प्रकारे खाजगी माहिती जनसामान्यांना सहज उपलब्ध होत आहे. यामुळे वैयक्तिक स्वातंत्र हिरावत चाललं आहे. गुप्तहेर एजन्सी आणि टेलिकॉम कंपन्यातील काही कर्मचारी अशा प्रकारची माहिती सहज उपलब्ध करून देत आहेत. 

रजनी पंडीत यांना देखील अटक 

एका बाजूला मुंबईत बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्डस अर्थात सीडीआर काढून सीडीआरची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये ठाणे गुन्हे शाखा युनिट एकने भारतातील पहिली महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केली आहे. ही घटना ताजी असताना अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.