मुंबई : कोरोना लसीमुळे लोकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती इतकी वाढविली की, व्हायरसच्या नवीन स्वरूपाच्या संपर्कात लोकं जरी आले तरी ते सुरक्षित राहू शकतात असे एका अभ्यासातून हे समोर आले आहे. अमेरिकेतील रॉकफेलर विद्यापीठाच्या संशोधनात कोविड -19 रुग्णांच्या रक्तातील अॅन्टीबॉडीजचा अभ्यास केला गेला. त्यांचे या संशोधनात सामील झालेल्या 63 व्यक्तींना गेल्या वर्षी कोरोनाची लगण झाली आहे. संशोधक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत आणि यामधील डेटा दर्शवत आहे की, कालांतराने 'मेमरी बी सेल्स' मधून तयार झालेल्या अॅन्टीबॉडीजमध्ये सार्स-सीओव्ही -2 (SARS-COV-2) ला मारुन टाकण्याची क्षमता वाढली आहे.
बर्याच प्रकारचे अॅन्टीबॉडीज 'मेमरी बी सेल्स' मध्ये साठवले जातात. यासंशोधनात असे दिसून आले की या अॅन्टीबॉडीजमध्ये व्हायरसविरूद्ध दीर्घकालीन संरक्षण शक्ती विकसित होत आहे.
संशोधकांना असे आढळले आहे की, मोडेरना किंवा फायझर लस कमीतकमी एक डोस घेतलेल्या 26 लोकांच्या गटामध्ये या अॅन्टीबॉडीजमध्ये आणखी वाढ झाली आहे. संशोधनात असेही दिसून आले आहे की, फायझर मोडेर्नाचे एमआरएन लस अधिक अॅन्टीबॉडीज तयार करते, त्यामानाने अॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीमुळे या अॅन्टीबॉडीजचे उत्पादन कमी होते.
जर एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूट्रीलाइजिंग अॅन्टीबॉडीज कमी आढळल्या तरी, त्या कोरोनाला रोखण्यासाठी सक्षम असतात. माहितीनुसार, जर एखाद्या लसीची कार्यक्षमता 50 टक्के असेल, तर ती कोरोना संसर्गाने बरे झालेल्या व्यक्तींपेक्षा 80 टक्के कमी अॅन्टीबॉडीज बनवते. परंतु तरीही, ही लस मोठ्या प्रमाणात लोकांचे संरक्षण करते.
त्याच बरोबर, जपानच्या योकोहामा सिटी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की कोरोना आजार असलेल्या लोकांना एका वर्षानंतरही पुरेसे अॅन्टीबॉडीज आढळले आहेत. परंतु ज्यांना जंतुसंसर्ग झाले आणि ज्यांची लक्षणे दिसली नाहीत त्यांच्यात कमी अॅन्टीबॉडीज आढळले आहेत.